Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : वैष्णोदेवी मंदिरातील दानपेटी फोडली; जळगाव तालुक्यातील मध्यरात्रीची घटना

Jalgaon News : शिरसोली येथील कुऱ्हाडदे रोडवरील वैष्णोदेवी माता मंदिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराला लावलेले तीन कुलुप तोडून दानपेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम घेऊन पसार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मंदिरात ठेवलेल्या दानपेट्या देखील चोरट्यांनी लक्ष केल्या आहेत. वैष्णोदेवी माता मंदिरातील दानपेटी (Jalgaon) फोडून चोरटयांनी दीड लाखांपर्यंतची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिरसोली (ता. जळगाव) येथे घडली. ही घटना सकाळी उघडकीस आली असून पोलिस (Police) याचा तपास करत आहेत. (Maharashtra News)

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील कुऱ्हाडदे रोडवरील वैष्णोदेवी (vaishnodevi) माता मंदिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराला लावलेले तीन कुलुप तोडून दानपेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम घेऊन (Theft) पसार झाले आहे. दरम्यान आज सकाळी मंदिरातील सुरक्षा रक्षक भावसिंग बारेला हा आरती करण्यासाठी आला असता त्यांना हा प्रकार दिसला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर भावसिंग बारेला याने मंदिराच्या संचालक राजु आबटकर, मधुकर आबटकर, भगवान बारी यांना कळविले. मागिल दीड ते दोन वर्षांपासून दानपेटीतील रक्कम काढलेली नव्हती. म्हणून अंदाजे यात एक ते दीड लाखापर्यंत रक्कम असण्याची शक्यता आहे. दरम्यान मंदिरातील चांदीचे वैष्णोदेवी माता मुर्ती वरील छत्र, डिजिटल मोठा स्पिकर व इतर काही वस्तु सुखरुप आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT