Jalgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ज्ञानेश्वर बारी हे पत्नी, मुलगा व मुलीसह वास्तव्यास होते. शेतीकाम करून ये परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : शेतीसाठी कर्ज घेतले असताना शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेतून (Farmer) शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे घडली. ज्ञानेश्वर तुकाराम बारी-खलसे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

Jalgaon News
Jayant Patil News: राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव; लोकशाहीची गुढी उभारुया.. जयंत पाटलांचे महाराष्ट्राला पत्र!

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील शिरसोली येथे ज्ञानेश्वर बारी हे पत्नी, मुलगा व मुलीसह वास्तव्यास होते. शेतीकाम करून ये परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी गावातील काही जणांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यातून काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Jalgaon News
Unseasonal Rain : चांदूरबाजार परिसरात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस; गहू, कांद्याचे नुकसान

दरम्यान ९ एप्रिलला शेतात कामाला गेल्यावर दुपारच्या सुमारास त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. आजूबाजूला शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावात कळविले. ग्रामस्थांनी धाव घेतली व एमआयडीसी (Police) पोलिसांना घटना कळविली. ज्ञानेश्वर बारी यांना खाली उतरवून शासकीय रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com