Jayant Patil News: राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव; लोकशाहीची गुढी उभारुया.. जयंत पाटलांचे महाराष्ट्राला पत्र!

Gudi Padwa Festival 2024: राज्यभरात गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याला उद्देशून लिहलेले पत्र व्हायरल होत आहे.
Jayant Patil Letter:
Jayant Patil Letter: Saamtv

रुपाली बडवे, मुंबई|ता. ९ एप्रिल २०२४

Jayant Patil Letter:

आज गुढीपाडवा. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. सर्व स्तरांमधून पाडव्याच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याला उद्देशून लिहलेले पत्र व्हायरल होत आहे.

जयंत पाटील यांचे पत्र...

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या  हार्दिक  शुभेच्छा. अनेक महापुरुषांचा वारसा असणारे आपले महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंकृत राज्य आहे. या राज्यात आपण जन्म‌लो हे आपले भाग्य. अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. संतांच्या वाणीने पावन झालेल्या भूमित जसे महाकाय सह्याद्री आणि विशाल अरबी समुद्र एकत्र नांदले. तसेच अनेक धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती एकत्र नांदल्या आणि भरभराटीस आल्या.

महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक..

येथे राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वीरतेची कथा लिहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेची तोरणे बांधली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रीयांचा मळवट शिक्षणाने भरला.  छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमतेच्या रेखा पुसट केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतर घटनेतच समानतेचा अधिकार दिला. हा सर्वसमावेशक समृद्ध वारसा पुढे नेणारे महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले.

Jayant Patil Letter:
Gudi Padwa 2024: PM मोदींकडून गुढी पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा; 'सविस्तर बोलू' म्हणत राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर येण्याचे आवाहन

शेतकरी बांधव हतबल...

मात्र आज परिस्थिती बदलली आहे. तत्वांशी तडजोड करत, नितीमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोकं वर काढते आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झाला आहे. सातत्याने होणाऱ्या गुन्हांच्या शृंखलेत राज्य बिथरले आहे. कृषी संस्कृती आपल्या छातीवर मिरवणारी ही काळी माती संकटात आहे. माझा शेतकरी बांधव हतबल आहे. राज्याचे भविष्य साकारणारा तरुण स्वतःच्याच भविष्याबद्दल अनभिज्ञ आहे. स्वार्थाच्या बाजारात तत्वे, निष्ठा विक्रीस काढण्यात आली आहेत. या नकारात्मकतेवर मात करायची असेल तर परिवर्तनाची वाट धरावी लागेल. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते.

त्यामुळे यंदाच्या पाडव्यासाठी निष्ठेच्या काठीला पुरोगामी विचारांचे वस्त्र बांधूयात. तत्व, नीतिमत्ता यांची हार-फुले चढवूयात. कडुलिंबाप्रमाणे सत्य कितीही कटू  असले तरी त्याच्याच  माळा लावूयात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा लखलखीत कलश त्यावर ठेवून लोकशाहीची गुढी सदैव उंच राहील याची प्रतिज्ञा करूयात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil Letter:
Lok Sabha Election Duty : इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी बोगस मेडिकल प्रमाणपत्र; संभाजीनगरमध्ये समोर आला प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com