Gudi Padwa 2024: PM मोदींकडून गुढी पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा; 'सविस्तर बोलू' म्हणत राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर येण्याचे आवाहन

Gudi Padwa News: देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनीही पाडव्याच्या सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Gudi Padwa Festival 2024:
Gudi Padwa Festival 2024:Saamtv
Published On

Gudi Padwa Festival 2024:

आज गुढीपाडवा. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. सर्व स्तरांमधून पाडव्याच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनीही पाडव्याच्या सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा...

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. गुढी पाडव्याची शुभ पहाट उजाडत असताना, सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अमर्याद आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. सर्वांची भावी वाटचाल यशाच्या तेजाने उजळून निघो हीच सदिच्छा, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच आपणास गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. बाकी सविस्तर बोलूच, शिवतीर्थावर या, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पाडव्याच्या शुभेच्छा देत मनसेच्या मेळाव्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.

Gudi Padwa Festival 2024:
Varandha Ghat Closed: महत्वाची बातमी! वरंधा घाट ३० मे पर्यंत बंद; पर्यायी मार्ग कोणते?

शरद पवारांकडूनही पाडव्याच्या शुभेच्छा...

"नवआकांक्षा आणि नवसंकल्पांनी आजचा गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा करूया. सुख, समृद्धी व नवचैतन्याची गुढी उभारूया. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा," अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gudi Padwa Festival 2024:
Buldhana : जमिनीचा योग्य मोबदला द्या अन्यथा...; बुलढाण्यातील ५ गावांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com