Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जुना वाद मिटविण्यासाठी बोलावून केलाघात; जळगावात तरुणाची हत्या

Jalgaon News : वाद मिटल्याचे अरुण व त्याच्या भावांना वाटत असतानाच १० डिसेंबरला दुपारी अरुणला वाद मिटविण्यासाठी काही जणांनी वंजारी टेकडीवर बोलावले होते

Rajesh Sonwane

जळगाव : जुन्या वादातून तरुणाचा चॉपरने वार करून खून केल्याची घटना जळगाव शहरात घडली. या (Jalgaon) घटनेत अरुण बळिराम सोनवणे (वय २८) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याच घटनेत अरुणला वाचवण्यास गेलेले दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर (Crime News) जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

जळगावातील समतानगरात वास्तव्यास असलेल्या अरुण सोनवणे याचा काही तरुणांसोबत जुना वाद होता. पोलिसांत (Police) प्रकरण गेले असताना वाद मिटविण्यात आला होता. मात्र बदल घेण्याची भावना संबंधित तरुणांच्या मनात होती. सदरचा वाद मिटल्याचे अरुण व त्याच्या भावांना वाटत असतानाच १० डिसेंबरला दुपारी अरुणला (Jalgaon Police) वाद मिटविण्यासाठी काही जणांनी वंजारी टेकडीवर बोलावले होते. अरुण तेथे एकटाच गेला असता चार ते पाच जणांनी त्याच्यावर चॉपरने वार करून खून केला. अरुणला वाचवताना त्याचा भाऊ गोकुळ बळिराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेही गंभीर जखमी झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अरुणसह जखमींना वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी अरुण सोनवणेला मृत घोषित केली. सदरचे वृत्त समजताच मित्रपरिवार आणि नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. मृत अरुण खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. काही महिन्यापूर्वीच त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. तो गाफील राहिल्याने त्याची हत्या झाली. संशयितांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुन्हेशाखची पथके रवाना केली. संशयितांना लवकरच अटक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT