Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : दुचाकी अडवून मारहाण करत पैसे घेऊन झाले पसार; जळगाव शहरातील घटना

Jalgaon News : दुचाकीने शिवाजी नगरात परिसरातून जात होता. त्या ठिकाणी पाठीमागून दुचाकीने आलेल्या तीन जणांनी तौसिफची दुचाकी अडविली. यानंतर तिघांनी तौसिफ आणि अरबाज यांना मारहाण केली

Rajesh Sonwane

जळगाव : जळगावातील शिवाजी नगरात परिसरातून दोन मित्र दुचाकीने जात होते. या वेळी त्यांचा रास्ता अडवून (Jalgaon) मारहाण करत लुटल्याची घटना घडली. त्यांच्याजवळील बॅग हिसकावून त्यातील पैसे काढून बॅग नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार देण्यात आली आहे. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गेंदालाल मिल परिसरातील तौसिफ सईद शेख (वय २३) हा तरूण २३ एप्रिलला रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र अरबाज शेख याच्यासोबत दुचाकीने शिवाजी नगरात परिसरातून जात होता. त्या ठिकाणी पाठीमागून दुचाकीने आलेल्या तीन जणांनी तौसिफची दुचाकी अडविली. यानंतर तिघांनी तौसिफ आणि अरबाज यांना मारहाण (Crime News) केली. तसेच तौसिफजवळ असलेली बॅग जबरी हिसकावून नेत बॅगेतील पैसे काढून ती बॅग जवळच्या नाल्यात फेकून दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकजण पोलिसांच्या ताब्यात 
सदरची घटना घडल्यानंतर तौसिफ सईद शेख यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश आनंदा कोळी (वय २४) याला अटक केली. तर त्याचे दोन्ही साथीदार हे फरार झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

SCROLL FOR NEXT