police 
महाराष्ट्र

Jalgaon Crime: गणेश भक्तांवर दारूच्या नशेत लाठीमार; वरिष्ठ पोलीस अधिकारी सस्पेंड, फडणवीसांची कठोर कारवाई

Jalgaon Crime : दारूच्या नशेत गणेश भक्तांवर लाठीचार्ज करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आलीय.

Bharat Jadhav

जळगावमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांवर लाठी हल्ला करणाऱ्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केलीय. बुलढाणा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर गणेश भक्तावर लाठीचार्ज करण्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलीय.

देवराम गवळी असं या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. जळगावमधील जामोद येथे मलकापूर येथील दंगल नियंत्रक पथकाचे घेऊन आल्यानंतर कोणतेही माहिती न घेता, वरिष्ठांशी चर्चा न करता वरिष्ठ पोलीस अधिकारी गवळी यांनी गणेश भक्तावर लाठीचार्ज केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी देवराम गवळी हे दारूच्या नशेत होते, असं निदर्शनात आलं आहे.

याबाबत तक्रार केल्यानंतर गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकारी गवळी यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) १९७९ च्या नियम ४ (१) (अ) सह नियम ६ (२) च्या तिसऱ्या कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

गवळी यांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये तीन तेच चार व्यक्ती गंभीर जखमी झालेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय,असा अहवाल पोलीस अधीक्षक बुलडाणा यांनी या कार्यालयात देण्यात आलाय. पोलीस अधीक्षकाचा पुढील आदेश येईपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांना निलंबन कायम असेल. तसेच पोलीस अधिक्षकाच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाहीये.

दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी राज्यातील अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडलेत. मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या. कोल्हापुरात पुढे न सरकणाऱ्या मिरवणुकीतील गणेश भक्तांना पोलिसांना लाठीचा प्रसाद दिला. पोलिसांनी बंदी घातल्यानंतरही येथे लेझर लाईट लावण्यात आले होते. अनेक गणेश मंडळांनी लेझर लाईटचा वापर केला होता.

नाचताना लागला धक्का; पोलीस पाटलासह दोन जणांवर चाकूने हल्ला

गणेश विसर्जन मिरवणूकीत नाचताना एकाला धक्का लागला. यामुळे मिरवणुकीत सहभागी पोलीस पाटील यांच्यासह दोन जणांवर चाकूने वार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सकमुर गावात घडली होती. गावचे पोलीस पाटील तुळशीराम काळे, मोहन तांगडे, विभाकर शेरके यांच्यावर सहकाऱ्यांसह चाकू हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले. प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT