Jalgaon Corporation
Jalgaon Corporation 
महाराष्ट्र

भाजपकडून शिवसेनेची कोंडी; स्विकृत नगसेवक निवडीवरून गोंधळ

संजय महाजन

जळगाव : महापालिकेची ऑनलाईन महासभा आज होती. महासभेच्या अजेंड्यावरील पहिल्याच विषयावर शिवसेनेच्या स्विकृत नगरसेवक निवडीवरून सभागृहात गोंधळ उडाला. या विषयावर विरोधक भाजपने सत्‍ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले. भाजप सदस्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची आधी बैठक घेवून त्यात निर्णय घेतला पाहिजे होता; असा मुद्दा मांडला. निवड करायची असेल तर मतदान घ्या अन्‍यथा विषय नामंजुर करा अशी मागणी केली. यामुळे गोंधळ झाल्‍याने अखेर महापौरांनी विशेष महासभा तहकुब केली. (jalgaon-corporation-news-Shiv-Sena-dilemma-from-BJP-Confusion-over-approved-Nagasevak-selection)

जळगाव महापालिकेची आज विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित केली होती. यात स्थायी समिती सदस्य, विविध समित्यांचे सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती केली जाणार होती. परंतु, सभेच्‍या पहिलाच विषय शिवसनेच्या स्विकृत नगरसेवकपदी विराज कावडीया यांच्‍या निवडीच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले. सत्‍ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य आमने- सामने आल्याने महासभेत प्रचंड गोंधळ झाला.

भाजपचे सदस्‍य आक्रमक

भाजप- शिवसेना सदस्यांमध्ये गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेचे दिपील पोकळे यांच्या नावाच्या गटनेता पदाची नावावरून भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. भाजपचे अॅड. शुचिता हाडांनी गटनेता पद भाजपचे असून शिवसेनेने चुकिच्या पद्धतीने निवड केली असून विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटनेतांची नोंद आहे. त्यामुळे ही निवड चुकीची असल्याचे सांगत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, जितेंद्र मराठे, डॉ. अश्विन सोनवणे यांनी जोरदार शाब्दीक हल्ला केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Broccoli Benefits: ब्रोकोली खाताय? फायदे जाणून घ्या

Pankaja Munde News Today: मराठा आंदोलक तरुणांची पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी!

Team India Squad: टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट! अशी असेल प्लेइंग ११

Arvind Kejriwal : माझी चिंता करू नका, लवकरच...; अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून कोणता मेसेज दिला?

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT