विनोद जिरे
बीड: गैरहजर सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवून, ग्रामस्थांनी निषेध केल्याचा प्रकार बीडच्या मोरेवाडी Morewadi Beed येथे समोर आला आहे. 2 वर्षांपासून सरपंच गैरहजर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हे देखील पहा-
याविषयी मोरेवाडी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटलंय की, येथील महिला सरपंच मागील काही वर्षापासून फक्त झेंडावंदन व सार्वजनिक उत्सवासाठीच ग्राम पंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामकाज त्या घरात बसूनच Work From Home करत आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात Office येत नाहीत.
तसेच, सरपंचांनी मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्यास कायदेशीर सांगण्यात यावे. अन्यथा वेगवेगळ्या आंदोलन आणि ग्राम पंचायतचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंचाच्या गैरहजर राहण्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क ग्राम पंचायत कार्यालयात, सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवले. दरम्यान या घटनेची अंबाजोगाई तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.