जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर निवडीच्यावेळी भाजपच्या काही नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला होता. यामुळे महापालिकेत सत्तांतर होवून भाजपच्या हातातील सत्ता गेली व शिवसेनेचे महापौर व उपमहापौर विराजमान झाले. परंतु, काही महिन्यातच भाजपच्या त्या बंडखोर ११ नगसेवकांनी आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करत घरवापसी केली. (jalgaon-corporation-news-bjp-11-member-return-bjp)
जळगाव महापालिकेत राजकीय घडमोडी सातत्याने होत आहेत. आजच्या महासभेदरम्यान भाजपच्या सदस्यांनी जोरदार बॅटींग केल्याने शिवसेनेला महासभा तहकुब करण्याची वेळ आली. काही क्षण उलटत नाही तोच भाजपचे बंडखोर ११ नगरसेवकांनी आमदार गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी आमदार भोळेंनी पून्हा भाजपात नगरसेवक आल्याचे स्वागत केले. यावेळी महानगाराध्यक्ष अॅड. सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे संख्याबळ वाढले
भाजपचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. काही महिने उलटल्यानंतर तीन दिवसांपूर्वी ३ बंडखोर नगसेवकांनी भाजपात पुन्हा प्रवेश केला. आज पुन्हा ११ बंडखोर नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपला सोडून गेलेल्या सदस्यांनी पुन्हा पक्षाची साथ घेतल्याचे दिसून येत आहे. यातच आज तब्बल ११ सदस्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केल्याने पक्षाची सभागृहातील सदस्यसंख्या ४३ झाली आहे.
या नगरसेवकांची घरवापसी
मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, रजंना सपकाळे, दत्तू कोळी, प्रविण कोल्हे, शोभा बारी, पार्वताबाई भिल, रुखसाना बबलू खान, प्रिया जोहरे आदी नगरसेवकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.