Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने संपविले जीवन; परीक्षा द्यायला गेला अन् घेतला गळफास

Jalgaon News : १९ जूनला मालेगाव येथे टायपिंग परीक्षा देण्यासाठी गेला होता. पेपर दिल्यानंतर त्यांचा परिवाराशी संपर्क होऊ शकला नाही

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय २७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मालेगाव येथे टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी गेला असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

चोपडा (Chopda) तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप पाटील हा १९ जूनला मालेगाव येथे टायपिंग परीक्षा देण्यासाठी गेला होता. पेपर दिल्यानंतर त्यांचा परिवाराशी संपर्क होऊ शकला नाही. मोबाईल बंद असल्याने त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा तपास न लागल्याने २० जूनला मालेगाव (Malegaon) छावणी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. मात्र, २२ जूनला नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत कुलदीपचा मृतदेह कामगारांना आढळून आला. 

माहिती मिळताच पोलिसांनी (Police) पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आपले जीवन संपविल्याने चहार्डी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलदीपने बारामती येथून एम. एसस्सी.(कृषी)चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होता. त्यात त्याला यश देखील मिळत होते. त्यात तो राज्यसेवेची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करीत होता. १९ जूनला तो मालेगाव येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या टंकलेखनाची (टायपिंग) परीक्षा देण्यासाठी गेला होता. परंतु, दुर्दैवाने त्याने गळफास लावून आपले जीवन संपविल्याने अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : पंचायत समिती सभापतिपदासाठी आज आरक्षण सोडत

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT