Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: आनंदी घरात अवघ्या क्षणात शोककळा; नाचताना भोवळ आली अन्‌..

आनंदी घरात अवघ्या क्षणात शोककळा; नाचताना भोवळ आली अन्‌..

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : काकांच्या घरी देवाच्या नवसाचा कार्यक्रमात नाचताना भोवळ येऊन खाली पडला आणि तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाल्‍याची धक्कादायक घटना घडली. ही दुर्दैवी घटना पहाटेच्‍या सुमारास (Chopda) चोपडा शहरातील रामपुरा पारधीवाडा येथे घडली आहे. (Live Marathi News)

चोपडा शहरातील रामपुरा (पारधीवाडा) येथे संदीप निळकंठ चव्हाण हा कुटुंबासह वास्तव्यास होता. गुरुवारी संदीप चव्हाण याच्या काकांकडे गावातच देवाच्या नवसाचा कार्यक्रम होता. यामुळे रात्रभर धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. या (Jalgaon News) कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत असताना त्‍याला चक्कर येवून तो जमिनीवर पडला. त्याला तात्काळ चोपडा उपजिल्हा (Hospital) रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला होता. रुग्णालयातील डॉ. प्रसाद पाटील यांनी त्‍यास मृत घोषित केले.

लग्‍नाचा वाढदिवस केला साजरा

मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला होता. या कार्यक्रमानंतर तो काकाकडे देवाच्‍या कार्यक्रमात गेला होता. येथेच त्याचा मृत्यू झाला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी अवघ्या क्षणात शोककळा पसरली. मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT