Jalgaon News Jalgaon News
महाराष्ट्र

Jalgaon News : खेळता खेळता नदीत उतरले; दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Jalgaon News : दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात. सदरची घटना १ मार्चला घडली.

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून (death) मृत्यू झाला. सदरची घटना (Chopda) चोपडा तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्ये एक सहावर्षीय मुलगी व एक सातवर्षीय मुलाचा समावेश आहे. (Latest Marathi News)

चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील मनीषा परशुराम कोटे (वय ६) व बाजीगर गाठीराम पावरा (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात. सदरची घटना १ मार्चला घडली. गावाच्या लागतच तापी नदी (Tapi River) असून ही दोन्ही मुले दुपारी नदीच्या काठाजवळच खेळत होती. दरम्यान सायंकाळी ही दोन्ही बालके दिसत नसल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. मात्र ते गावात कुठेही आढळून आली नाहीत. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर ग्रामस्थांनी तापी नदीकडे धाव घेतली. चार, पाच दिवसांपूर्वी गूळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडले गेल्याने नदीला पाणी होते. या पाण्यात दोन्ही बालके सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळून आले. गावातील नागरिकांनी दोन्ही बालकांना तापी नदीतून काढत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

SCROLL FOR NEXT