Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : ५ हजार स्वीकारणे ग्रामसेवकाला पडले महागात; एसीबीकडून कारवाई

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीकडून परवानगी देण्यात आली होती. या कामाचा मोबदला म्हणून ५ हजार रुपयांची (Bribe) लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (Breaking Marathi News)

देवगाव पारगाव (ता, चोपडा) येथील तक्रारदारांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat) परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. दरम्यान संशयित आरोपी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय ३९) यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. ही परवानगी दिल्याच्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदारांकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर ३१ जानेवारीला दुपारी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ग्रामसेवकास अटक करून त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT