Jalgaon Chalisgaon News
Jalgaon Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी बसविले; काळजी घ्या म्‍हणत रेल्वेतून उतरताना मुलाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : आई- वडिल हरिद्वार येथे यात्रेसाठी जात असल्याने त्यांना रेल्वे स्थानकावर पोहचवून रेल्वेमध्ये (Railway) बसवून त्याच रेल्वेच्या डब्यातून उतरताना गाडीचा वेग वाढल्याने नियंत्रण सुटून रेल्वेखाली आल्याने शिक्षकाचा (Chalisgaon) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी (२५ मे) पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. (Maharashtra News)

मूळचे माळशेवगे (ता. चाळीसगाव) रहिवासी असलेले योगेश गंभीरराव सूर्यवंशी (वय ४१) चिंचगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. ते आपल्या आई– वडील व कुटुंबासह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनी, बाप्पा पॉंईट परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचे आई- वडील हरीद्वार येथे यात्रेसाठी जात असल्याने गुरुवारी (ता. २५) पहाटे पाचच्या सुमारास त्यांना सोडण्यासाठी योगेश सूर्यवंशी हे रेल्वे स्थानकावर आले होते.

रेल्‍वेतून उतरताना गेला तोल

आई– वडिलांना पहाटेच्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये त्यांनी बसवले. मात्र, त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने योगेश पाटील हे घाईत रेल्वेतून उतरताना गाडीकडे ओढले गेले. यात ते रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना प्लॅटफार्मवरील इतर प्रवाशांचा लक्षात येताच, त्यांनी धाव घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. रेल्वे पोलिसांनी (railway Police) त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार जंजाळकर तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT