चाळीसगाव (जळगाव) : सीमा सुरक्षा दलात भरती झाल्यानंतर आसाम येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या सेवानिवृत्ती शेवटचे (Chalisgaon) सात महिन्यांचा कालावधी बाकी असताना कोदगाव (ता. चाळीसगाव) येथील जवान प्रदीप नाना पाटील यांना वीरमरण (Soldier Death) आले. त्यांच्या गावी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Latest Marathi News)
प्रदीप नाना पाटील हे कोदगाव येथील भूमिपुत्र होते. त्यांचे वडील नाना आप्पा हे बागायतदार शेतकरी तर दोन मोठे भाऊ बाबाजी व सतीश हे शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करतात. तर प्रदीप पाटील हे २००३ साली बीएसएफमध्ये भरती झाले होते. सध्या ते आसाम येथे कर्तव्य बजावत होते. सकाळी प्रदीप पाटील हे परेडमध्ये सहभागी झाले. परेड सुरु असतांना त्यांच्या छातीत वेदना व्हायला लागली. यानंतर त्यांना सहकाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन– तीन दिवस उपचार सुरु असतांना १३ मार्चला सकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र असलेले प्रदीप पाटील यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनात गावात आले. चाळीसगाव शहरातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत भारत मातेचा जयघोष करत पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला आहे. कोदगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्सहाकार करण्यात आले.
सहावीतील मुलाने दिला मुखाग्नी
प्रदीप पाटील यांचा मुलगा सहावीत आहे. तर मुलगी ही चौथीत शिकते. पत्नी ज्योती यांना अश्रू अनावर झाले होते. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने वडिल प्रदीप पाटील यांना मुखाग्नी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.