Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: लिंबूच्या शेतात पिकवला गांजा; शेत शिवारातील १२८ झाडे उद्‌ध्वस्त

लिंबूच्या शेतात पिकवला गांजा; शेत शिवारातील १२८ झाडे उद्‌ध्वस्त

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी उपरोधिक मागणी यापूर्वी अनेक (Farmer) शेतकऱ्यांनी केली आहे. बहाळ (ता. चाळीसगाव) येथील एकाने चक्क लिंबूच्या बागेतच गांजाची शेती पिकविली. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १२८ झाडे लावल्याचे (Chalisgaon) चौकशीत निष्पन्न झाले असून या शेतकऱ्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. (Breaking Marathi News)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, श्री. आव्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत, मिळालेल्या माहितीनुसार, बहाळ येथे धडक देत, गांजाची शेती करण्याचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहाळ शिवारातील कैलास लुकडू बेलदार (वय ६१) यांनी गट क्रमांक ९४९ मधील लिंबूंच्या शेतामध्ये तब्बल १२८ गांजाची झाडे लावलेली मिळून आली.

गांजाची शेती केली उद्‌ध्वस्त

पोलिसांनी (Police) छापा टाकून कैलास बेलदार यांच्या लिंबूंच्या शेतात छुप्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या व मानवी शरीरास अपायकारक असलेला गांजा ताब्यात घेतला. शेतकऱ्याने त्याच्या आर्थिक हितासाठी बेकायदेशीरपणे लागवड करून सुमारे २ लाख ५ हजार ७०० रुपये किमतीचा २० किलो ५७० ग्रॅम वजनाचा ओला गांजा साठवून ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर तो चार प्लास्टिक गोण्यांमध्ये भरुन पोलिसांनी जप्त करुन पोलिस ठाण्यात आणला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुदर्शन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास बेलदार यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी व द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८ (ब), २० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

SCROLL FOR NEXT