Pandharpur News: चंद्रभागेतून गाढवांच्‍या मदतीने वाळूचोरी; पंढरपुरात २२ गाढवं पकडली

चंद्रभागेतून गाढवांच्‍या मदतीने वाळूचोरी; पंढरपुरात २२ गाढवं पकडली
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या तोंडावर महसूल प्रशासनाने वाळू चोरी विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी इसबावी येथून वाळू वाहतूक करणाऱ्या सात लाकडी होड्या नष्ट केल्यानंतर (Pandharpur) पंढरपूर व शेगाव दुमाला येथे वाळूचोरी विरोधात कारवाई केली आहे. (Tajya Batmya)

Pandharpur News
Dhule News: दोन दुकानांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी वाळू चोरी विरोधात कारवाईसाठी पथके तयार केली आहेत. चंद्रभागेच्या पात्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या २२ गाढवांवर कारवाई केली आहे. अज्ञात मालकांच्या या गाढवांची रवानगी आता सोलापूर येथील कोंडवाड्यात केली आहे‌.

Pandharpur News
Dhule News: रेल्वेखाली उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्ज, नापिकेमुळे उचलले पाऊल

सदरची कारवाई प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केली. याच दरम्यान पंढरपूर जवळच्या शेगाव दुमाला येथे भीमा नदीतून होणार अवैध वाळू उपशावर महिला तलाठी पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या कारवाईत ३० पोती वाळू साठा जप्त करण्यात आला. सोबत चोरट्यांच्या दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. तर दुसऱ्या कारवाईत महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरली जाणारी २२ गाढवे पकडून सोलापूर (Solapur) महापालिकेच्या कोंडवाडामध्ये पाठवली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com