Chalisgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Accident : बाजार करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत बापलेकाचा मृत्यू, पत्नी गंभीर

Jalgaon News : बाजार असल्याने ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात आले होते. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले.

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : आठवडे बाजार असल्याने पती- पत्नी आणि मुलगा बाजारात गेले होते. बाजार करून झाल्यानंतर घरी परतताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून जाताना उभ्या ट्रकला धडकून बापलेकाचा मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ हा अपघात घडला. कळमडू (ता. चाळीसगाव) येथे (Chalisgaon) सालदार म्हणून काम करणारा मोतीराम पावरा (वय ४५) हे पत्नी, मुलगा व मुलीसह शेतातच वास्तव्यास आहेत. शुक्रवारचा बाजार असल्याने ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात आले होते. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली. (Accident) यात मोतीराम पावरा, त्यांचा मुलगा विकी पावरा (वय १०) हे दोघे जागीच ठार झाले.

दुचाकीवर असलेली मोतीराम यांची पत्नी रायाबाई पावरा (वय ४०) गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला धुळे येथे रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी येथील सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह भूषण बाविस्कर, राकेश काळे यांनी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृत मोतीराम पावरा सेंधवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार

KL Rahul: केएल राहुलने लखनऊची साथ का सोडली? स्वत:च सांगितलं कारण

Maharashtra News Live Updates: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Naresh Goyal : नरेश गोयल यांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरण?

News Explainer : महायुतीत कोण एक, कोण सेफ? काय आहे राजकीय अर्थ? VIDEO

SCROLL FOR NEXT