Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: माहेरी पाठवत मोबाइलवर तलाक; पतीसह आठ जणांवर गुन्हा

माहेरी पाठवत भ्रमणध्वनीवरून तलाक; पतीसह आठ जणांवर गुन्हा

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : विवाहितेचा छळ करून भ्रमणध्वनीवरून तलाक दिल्याप्रकरणी नंदुरबार (Nandurbar) येथील सासरच्या आठ जणांविरोधात मेहुणबारे पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

मेहुणबारे (जळगाव) येथील माहेर असलेली आसमा शेख जुनेद यांचा विवाह नंदुरबार येथील जुनैद शेख जावेद याच्याशी झाला होता. लग्नानंतर (Marriage) सात, आठ दिवसांतच सासऱ्यांकडून आसमा हिचा छळ होऊ लागला. जेवण न देता शिवीगाळ, मारहाण होऊ लागली. त्यातच आसमा हीस मुलगी झाली. म्हणून छळ अधिकच वाढला. घर बांधण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र वडिलांचे निधन झाल्याने एवढे पैसे देऊ शकत नाही असे सांगितले असता, पतीने मारहाण करून तीन तलाक देऊन टाकण्याची धमकी दिली.

माहेरी पाठवून फोनवर दिला तलाक

त्यानंतर आसमा हीस माहेरी पाठवून दिले. २३ जानेवारीला पती जुनेद शेख याने भ्रमणध्वनीवरून ‘मला तुझ्या सोबत राहायचे नाही’, असे सांगून तीन वेळा तलाक बोलून तलाक दिला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती शेख जुनैद शेख जावेद, सासू हमिदा शेख, जेठ जहीर शेख, तसेच जुबेर शेख, जेठानी मेहजबिन शेख जहीर, अफसिन शेख जुबेर, नणंद नुसरत नईम काझी, नईम मुबिन काझी (सर्व रा. नंदुरबार) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT