Chalisgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon: सेवानिवृत्‍त पोलिस अधिकाऱ्याच्‍या घरी धाडसी चोरी; आठ लाखाचा ऐवज लंपास

सेवानिवृत्‍त पोलिस अधिकाऱ्याच्‍या घरी धाडसी चोरी; आठ लाखाचा ऐवज लंपास

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : खेडी खुर्द (ता. चाळीसगाव) येथील सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस (Police) अधिक्षक यांच्या घरातून चोरट्यांनी आठ लाख वीस हजाराचा ऐवज लंपास केला. चोरीत (Theft) दहा हजार रुपये रोख, आठ लाखाचे दागिने असा एकूण आठ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. (Maharashtra News)

कपाटाचे लॉकर तुटलेले

घरात प्रवेश करताच मुकेशची आई कुसुम पाटील यानी बेडरूमध्ये असलेले कपाट उघडे दिसले. त्यांनी आरडाओरड केली व सेवानिवृत्त डीवायएसपी मुलगा मुकेश तेथे गेले असता त्यांना कपाटातील लाँकर तुटलेले दिसले. तसेच कपाटात ठेवलेल्या बँगाच्या चैनी उघडलेल्या दिसल्या व स्वयंपाक घरातील कपाटाचे लाँकर तुटलेले दिसले.

खेडी खु. (ता. चाळीसगाव) येथील धनराज परशुराम पाटील हे सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिक्षक असुन त्यांच्या पत्नी समवेत येथे राहतात. धनराज पाटील व त्यांची पत्नी, मुलगा मुकेश पाटील हे २७ ऑक्‍टोंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास औषधोपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे गेले होते. दवाखान्‍याचे काम आटोपून ते २८ ऑक्‍टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास घरी खेडी खुर्द येथे परत आले. यानंतर मुलगा मुकेशने आपल्या जवळील चाबीने कुलुपाला लावली असता चावी कुलुपमध्ये गोल गोल फिरु लागली. त्यामुळे सर्वजण एकदम गोधंळले व घराचे कुलुप उघटत नसल्याने शेवटी कुलुप तोडले.

दागिन्‍यांसोबत बँक पासबुक एटीएम कार्डही नेले

कपाटातील दागिने चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चोरीमध्ये २ लाख रुपयाचे ४० ग्रँम वजनाची सोन्याची चैन, २ लाख रुपयाची ४० ग्रँम वजनाची सोन्याची मोहन माळ, ३ लाख रुपये ६० ग्रँम वजनाच्या चार बांगड्या, ५० हजार रुपयाचे १० ग्रँम वजनाची सोन्याच्या दोन अंगठ्या, ६० हजार रुपयाच्‍या ४ अंगठ्या, १२ ग्रँम वजनाच्या व १० हजार रुपये रोख असा ८ लाख २० हजार रुपयांची धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी दागिन्यांची चोरी बरोबर प्राँपर्टीचे तसेच इन्शुरन्सचे व बँकेचे पासबुक एटीएम कार्ड देखील घेऊन गेले आहेत. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मुकेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे मैदानात

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT