Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News : गुटखा विक्रेत्यावर कारवाई; चाळीसगावात सव्वा नऊ लाखांचा माल जप्त

Jalgaon News : चाळीसगाव शहरातील तिरंगा पुलावरून वाहनातून प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : गुटखा विक्री करण्यास बंदी असतानाही देखील गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे. याबाबत पोलिसांना (Police) माहिती मिळाल्यानंतर गुटखा विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई करून (Chalisgaon) त्याच्याकडील गुटख्याच्या १८ गोण्यांसह गाडी असा मिळून सुमारे ९ लाख २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Latest Marathi News)

चाळीसगाव शहरातील तिरंगा पुलावरून वाहनातून प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुलावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. (Jalgaon) दरम्यान रात्री सव्वा दहाच्या सुमारास सदरची गाडी येताना दिसली असता तिची तपासणी केली. त्यात लहानमोठ्या अशा १८ गोण्या आढळून आल्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी गोण्यांची तपासणी केली. त्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आली. याप्रकरणी अक्षय गुलाब कोतकर याला मुद्देमाल व वाहनासह पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना कळवून पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून संशयित आरोपी अक्षय कोतकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT