Chalisgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Accident : घरी परतणाऱ्या मजुरांच्या गाडीला अपघात; तीन मजूरांचा मृत्यू

jalgaon News : लाईनवर तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : रेल्वे लाइनचे काम करून घराकडे परतणाऱ्या मजुरांच्या डंपर आणि समोरुन येणाऱ्या पीकअप यांच्यात (Jalgaon) जोरदार धडक झाली. या अपघातात तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात (Accident) रात्री अकराच्या सुमारास हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ घडला. (Breaking Marathi News)

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या (Railway) तिसऱ्या लाइनचे काम सध्या सुरू आहे. या लाईनवर तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात असताना (Chalisgaon) चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडी व डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. यात डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात एका महिलेसह एक जागीच ठार झाले होते. तर अन्य माजू जखमी झाले. तसेच एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी धावले. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT