Parbhani Bus Accident: चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलावरून खाली कोसळली; परभणीमध्ये भीषण अपघात, 25 प्रवासी जखमी

Jintur Solapur Bus Accident: जिंतूर सोलापूर जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस पुलाखाली कोसळली. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
Parbhani Bus Accident
Parbhani Bus AccidentSaam Tv
Published On

राजेश काटकर

Bus Accident News

परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सोलापूर जाणाऱ्या बसचा (Jintur Solapur Bus) अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Accident News)

जिंतूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस पुलाच्या खाली कोसळल्याची माहिती (Jintur Solapur Bus Accident) मिळतेय. आज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिंतूर सोलापूर जाणाऱ्या बसचा अपघात

या अपघातात ड्रायवर, कंडक्टरसह जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिंतूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू (Bus Accident) आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली आहे.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात येत (Parbhani Bus Accident) होतं. बस अचानक पुलाखाली कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Parbhani Bus Accident
Ulhasnagar Accident News : दोन घास खाण्यासाठी ट्रकच्या सावलीत बसला; चालकाचा निष्काळजीपणा अन् जेवता जेवता वृद्धाचा मृत्यू

बस थेट नदीपात्रात कोसळली

व्हिडिओमध्ये बसभोवती नागरिकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय. तर रस्त्यावरील कठडा तुटलेला दिसत आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात परभणी जिल्ह्यातील अकोली पूलाजवळ घडला (Accident News) आहे. पूलावरून बस थेट खाली नदीपात्रात कोसळली. बस सुमारे ५० फुट खाली कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. १० जखमी प्रवाश्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे (Akoli Bridge Parbhani) हा अपघात झाला आहे. जखमी प्रवाशांना खाजगी वाहनातून रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

Parbhani Bus Accident
Akkalkuwa Accident : देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, १७ भाविक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com