Chalisgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

Jalgaon News : मायाबाईंच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केल्याने तिचे पती तेथेच होते. दरम्यान ३ मार्चला पहाटे चारला मायाबाईंचा मुलगा गौरवला जाग आली असता त्याला आई मायाबाई आढळून आली नाही.

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला. यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून (Jalgaon) पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह नदीपात्रातील वाळूमध्ये बुजण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र मारेकऱ्याला येथील पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून संशयिताने खुनाची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. (Tajya Batmya)

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील मायाबाई संजय मोरे (वय ३५) ही महिला मुलासह २ मार्चला रात्री दहाला झोपली होती. मायाबाईंच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केल्याने तिचे पती तेथेच होते. दरम्यान ३ मार्चला पहाटे चारला मायाबाईंचा मुलगा गौरवला जाग आली असता त्याला आई मायाबाई आढळून आली नाही. त्यामुळे त्याने धावत जाऊन शेजारी राहणाऱ्या काकाला याबाबत माहिती दिली. यानंतर काका सर्जेराव मोरे व इतरांनी मायाबाईचा शोध सुरू केला. वरखेडे खुर्द शिवारात (Crime News) मक्याच्या शेतात शोध घेत असता मक्याचे ताटे ठिकठिकाणी तुटलेले आढळले. त्याच ठिकाणी रक्त सांडलेले दिसले. काचेच्या तुटलेल्या बांगड्याही मिळून आल्या. त्यामुळे काही तरी घातपात झाल्याचा कुटुंबीयांना संशय आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाळूत पुरलेला मृतदेह आढळला 
मायाबाईंचा शोध सुरू असताना सर्जेराव मोरे व काही जण गिरणा नदीकडे गेले. त्यांना नदीपात्रात वाळूचा ढिग दिसला. ज्यात मायाबाईंचा अर्धवट बुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तत्काळ पोलिस पाटील संतोष तिरमली यांना माहिती दिली. घडलेला प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देणार आली. यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. यात मायाबाईंच्या डोक्यावर, दोन्ही कानांजवळ, छातीवर तसेच मांडीवर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले. 

संशयिताने दिली खुनाची कबुली 

पोलिसांनी तपासाच्या चक्रे फिरविले. सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांना या खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या संशयिताची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी एक टीम संशयिताच्या शोधार्थ पाठविले. संशयित हा वरखेडे खुर्दच्या डोंगराळ भागात बकऱ्या चारत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला पोलिस ठाण्यात आणल्यावर विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. संजय धोंडा गायकवाड (वय ३१, रा. वरखेडे खुर्द) असे संशयिताचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

Movie Price : आता फक्त 200 रुपयांत पाहा चित्रपट, सरकारचा मोठा निर्णय

Gmail अकांऊटचा स्टोरेज कसा क्लिअर कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT