Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : चाळीसगाव हादरले; पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पतीचे भयानक कृत्य, भावाला फोन करत दिली माहिती, स्वतःही संपविले जीवन

Jalgaon News : अशोक व विजय हातगाव शिवारातील वडिलोपार्जित शेती करून उदारनिर्वाह करतात. विजयचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : पत्नीच्या चारित्र्यावर संशयाची सुई चुकचुकली. या कारणावरून पती- पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. दरम्यान मोठ्या भावाने समजूत काढून देखील उपयोग झाला नाही. अखेर शेतात गेले असताना संशयातून दोरीच्या साहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वतः झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील हातगाव शिवारात २ जूनला सदरची घटना उघडकीस आली आहे. हातगाव शिवारात आदिवासी वस्तीत विजय सुकदेव चव्हाणके (वय ३८) पत्नी वर्षा, मुले गणेश व अमृता यांच्यासह वास्तव्यास होता. तर त्याच्या घराशेजारी मोठा भाऊ अशोक चव्हाणके (वय ५०) राहतो. अशोक व विजय हातगाव शिवारातील वडिलोपार्जित शेती करून उदारनिर्वाह करतात. विजयचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. यातूनच त्याचे आणि पत्नी वर्षा यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. 

अखेर पत्नीला जीवे मारत संपविले जीवन 

दरम्यान पत्नी वर्षा हिचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत; असा संशय विजयला असल्याने यातून दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झाले होते. याबाबत भाऊ अशोकने समजूत काढली. मात्र, संशय दूर होत नव्हता. याच दरम्यान २ जूनला पती- पत्नी शेतात गेले असताना या संशयातून वियज याने पत्नी वर्ष हीचा गळा आवळून हत्या केली. यानंतर जवळच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी भावाला फोन करून दिली माहिती 

तत्पूर्वी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विजयने नाशिक येथे असलेला भाऊ राजेंद्र याला फोन करून पत्नी वर्षा हिला संपविले आहे. तसेच तो देखील जीवाचे बरे वाईट करणार असल्याचे सांगितले. यानंतर राजेंद्रने तत्काळ हातगाव येथे मोठा भाऊ अशोकला कळविले. यानंतर अशोक व पुतण्याने तपास केला असता विजय व वर्षा घरी नव्हते. त्यामुळे त्यांना शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला विजय गळफास घेतल्याचये स्थितीत दिसला. तर वर्षा जमिनीवर मृतावस्थेत दिसून आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT