Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : मुलाला शाळेत सोडून घरी परतताना काळाचा घाला; दुचाकीने मागून धडक दिल्याने पित्याचा मृत्यू

Chalisgaon News : चाळीसगाव येथे शाळेत मुलाला शिक्षणासाठी टाकले होते. यामुळे मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने दसेगाव फाट्यावर यावे लागत होते.

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : मुलाची शाळेत जाण्यासाठी केलेल्या व्हॅन येण्याची वेळ झाल्याने मुलाला दुचाकीवर घेऊन शाळेच्या गाडी बसविले. मुलाला सोडून वडील दुचाकीने घरी जात असताना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नवे दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील सुवर्णसिंग घोरपडे (वय ३५) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव येथे शाळेत मुलाला शिक्षणासाठी टाकले होते. यामुळे मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने दसेगाव फाट्यावर यावे लागत होते. दरम्यान नेहमीप्रमाणे सुवर्णसिंग घोरपडे हे फाट्यावर आले असता मुलाला व्हॅनमध्ये बसवले. यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. दसेगाव फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असल्याने एकमार्गी रस्त्यावर सुवर्णसिंग दुचाकीने जुने दसेगाव फाट्याकडे वळण घेत असतांना चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणार्‍या दुचाकी चालकाने सुवर्णसिंग याच्या दुचाकीला मागून जोरदार (Accident) धडक दिली. त्यात सुवर्णसिंग हा रस्त्यावर पडला. 

दुचाकीने दिलेल्या धडकेत जबर मार लागल्याने नागरीकांनी आधी चाळीसगाव येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक मार लागल्याने त्यास धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा सहाव्या दिवशी मृत्यू झाला. यावेळी धडक देणारा दुचाकीस्वार दुचाकीसह पळून गेला. सदर घटना १ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी फरार दुचाकी चालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT