Jalgaon Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : मध्यरात्री महामार्गावर भयंकर अपघात, सहा वाहने एकमेकांना धडकली अन्...

Jalgaon Accident News : जळगाव बाह्यवळण महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळ काचेच्या बाटल्यांचा कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात मोठे नुकसान होऊन वाहतूक काही काळ ठप्प झाली.

Alisha Khedekar

  • कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची साखळी धडक

  • रस्त्यावर काचेचा खच तयार होऊन वाहतूक ठप्प

  • कार, ट्रक व व्यावसायिक वाहनांचे मोठे नुकसान

  • एका ट्रकचालकाला दुखापत

जळगाव शहरालगतच्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळ शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. काचेच्या बाटल्यांनी भरलेला कंटेनर अचानक कलंडल्याने मागून येणाऱ्या सहा वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एका ट्रकचालकास दुखापत झाली आहे. अपघातामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाळधीकडून तरसोदकडे काचेच्या बाटल्यांचा माल घेऊन कंटेनर जात होता. नवीन बायपास महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळील मोकळ्या रस्त्यावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, संतुलन बिघडल्याने कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा कलंडला.

या घटनेनंतर कंटेनरमधील काचेच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले. मोठ्या प्रमाणावर काचा फुटल्याने रस्त्यावर काचेचा खच तयार झाला. कंटेनर अचानक आडवा झाल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच ब्रेक लावता आले नाहीत. परिणामी एकामागून एक अशी सहा वाहने एकमेकांना धडकली.

या साखळी अपघातात काही कार, मालवाहू ट्रक व हलक्या व्यावसायिक वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही वाहनांच्या समोरील भागाचे अतोनात नुकसान झाले असून काचा फुटणे, बोनट दुमडणे व इंजिनला धक्का बसल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT