PM Narendra Modi Jalgaon Visit:  Saamtv
महाराष्ट्र

PM Modi Speech : 'पोलंडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले', PM मोदींनी सांगितला परदेश दौऱ्याचा किस्सा; नेमके काय म्हणाले?

PM Narendra Modi Jalgaon Visit Live Updates: यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळाली आहे, असे म्हणत लाभार्थींचे अभिनंदन केले.

संजय महाजन

जळगाव, ता. २५ ऑगस्ट २०२४

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) आज जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे 25 ऑगस्ट रोजी 'प्राईम इंडस्ट्रियल पार्क' येथे होणाऱ्या 'लखपती दीदी संमेलनाला त्यांनी हजेरी लावली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळाली आहे, असे म्हणत लाभार्थींचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारचेही कौतुक केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली. सर्वप्रथम त्यांनी श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नेपाळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेपाळ बस अपघाताची घटना घडली तसे आम्ही रक्षा खडसे ना तिथं पाठवले, केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

तसेच " महाराष्ट्राचे संस्कार फक्त भारतात नाहीत जगभर पसरले आहेत. कालची मी परदेश दौऱ्यावरुन आलो. मी युरोपमधील पोलांडमध्ये गेले होतो तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले, इथल्या संस्काराचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप आदर करतात. पोलांडमध्ये महाराष्ट्राच्या लोकांना फार मोठा समूह आहे. आमचे जळगाव वारकरी परंपरांचे तीर्थ आहे, मुक्ताई ची ही भूमी आहे, बहिणाबाईंच्या ओळी प्रेरणा देणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातल्या बहिणीच छान काम करतात, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

लखपती दीदी बनवण्याचे महाअभियान

"तसेच मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे," असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT