जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजप माजी नगरसेवक प्रभाकर चौधरींवर कोयत्याने हल्ला
हल्ल्यात गंभीर जखमी, धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल
घटनेनंतर पोलिसांचा तातडीने तपास, हल्लेखोर फरार
हल्ल्यामुळे चाळीसगाव आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ
BJP Leader Attacked with Sickle in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावामधील भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजतेय. चौधरी यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैणात करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावमधील वैष्णवी साडी सेंटरजवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना एकटं गाठून डाव साधला. अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून चौधरी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळ्याच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सोमवारी चाळीसगावमध्ये चौधरी यांच्या कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आता चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरे काही कारण होतं, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.
चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी आपली पथके रवाना केलीत. चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा चाळीसगावमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.