Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: शाळेचा पहिला दिवस ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस; प्रार्थना म्‍हणतानाच झाले होत्‍याचे नव्‍हते

शाळेचा पहिला दिवस ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस; प्रार्थना म्‍हणतानाच झाले होत्‍याचे नव्‍हते

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उन्‍हाळी सुट्या संपल्यानंतर आता शाळा सुरू होत आहेत. मुल देखील मोठ्या आनंदाने शाळेची (School) तयारी करून शाळेत मार्गस्‍थ होत आहेत. असाच सुट्यानंतर शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी शाळेत गेला अन्‌ त्‍याच्‍या जीवनाचा (Jalgaon) अंत झाला. प्रार्थना म्हणत असताना विद्यार्थ्याला चक्कर येवून जमिनीवर कोसळला. यानंतर त्‍याचा शाळेचा पहिला दिवस आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला आहे. चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील ही दुर्देवी घटना आहे. सुयोग भूषण बडगुजर (वय १३) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाळी सुटी संपल्यानंतर सोमवारी जळगाव जिल्ह्यातील काही शाळा सुरू झाल्या. आठवीच्या वर्गात गेल्‍यानंतर पहिला दिवस असल्याने सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेची प्रार्थना सुरू असताना सुयोगला चक्कर आले व तो जमिनीवर कोसळला. प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेतील (Bhusawal) शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र उपचारादरम्‍यान त्याचा मृत्यू झाला.

वडील, आजोबा व सुयोगच्‍या मृत्‍यूचे साम्‍य

सुयोगला दोन ते तीन महिन्यांपूर्वी ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन आजार असल्याचे निदान झाले होते. याबाबत त्याने दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांना दाखविले होते. सुयोगची आजाराबाबत फॅमिली हिस्ट्रीपण आहे. सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वी याच आजाराने मृत्‍यू झाला होता. तर आजोबा पण याच आजाराने वारले असल्याची माहिती दिली. सुयोग बडगुजर याची दोन दिवसानी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती. त्यापूर्वीच त्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT