Bribe Case: औषध निरीक्षकास २० हजार रूपये घेतांना पकडले; दुकान परवान्यासाठी मागितली होती लाच

औषध निरीक्षकास २० हजार रूपये घेतांना पकडले; दुकान परवान्यासाठी मागितली होती लाच
Bhandara News Bribe Case
Bhandara News Bribe CaseSaam tv
Published On

शुभम देशमुख

भंडारा : औषधी दुकानाच्या परवान्यासाठी २० हजार रूपयाची लाच (Bribe) मागणाऱ्या लाचखोर औषधी निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना भंडारा (Bhandara) येथे घडली. प्रशांत राजेंद्र रामटेके असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. (Maharashtra News)

Bhandara News Bribe Case
Ashadhi Wari 2023: वारीत दिसला जातीय सलोखा; मुस्लिम तरुणांनी दिला पालखीला खांदा

कीर्ती मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटलमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी तक्रारदार यांनी अन्न व औषध प्रशासन भंडारा यांचेकडे अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या फार्मसीच्या परवान्‍याचे कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या न काढल्यामुळे फार्मसीचे परवाना मंजूर झाला आहे. त्याचाच मोबदला म्हणून आलोसे यांनी तक्रारदार यांना २० हजार रुपयांची मागणी केली.

Bhandara News Bribe Case
Dombivali News: रील काढणे बेतले जीवावर; पंप हाऊसमधील विहीरीत पडून तरूणाचा मृत्यू

पडताळणी कारवाई दरम्यान पंचांसमक्ष तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या दरम्‍यान लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली. लाच लुचपत विभागाने (ACB) सापळा रचत केलेल्‍या कारवाई दरम्यान पंचांसमक्ष त्यांनी १५ हजार रुपयाची रक्कम स्विकारताना आढळून आले. यानंतर त्‍यांना अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com