Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Fake Notes : तीन लाखाच्या नकली नोटा जप्त; भुसावळात चलनात येण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई

Jalgaon News : भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती.

Rajesh Sonwane

जळगाव : एका वाहनातून नकली नोटा चलनात आणल्या जाणार असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल तीन लाख रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या नोटा जप्त करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

भुसावळ (Bhusawal) शहरात बनावट नोटा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून भुसावळात सापळा रचण्यात आला होता. दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास तीन जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या नकली नोटांचा (Fake Notes) व्यवहार करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून होते. शेवटी, संशयितांनी एका ठिकाणी व्यवहार पूर्ण केला आणि पैसे देण्याची तयारी दर्शवली असता पोलिसांनी लागलीच त्यांच्याजवळ जात रंगेहाथ पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर तिघांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी या कारवाईत एक वाहन व तीन लाख रुपयांचे नकली नोटासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८), नदीम खान रहीम खान (वय ३०) व अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७) यांचा समावेश आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक राहूल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, निलेश चौधरी, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

Assembly Election: व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध; देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला नोमानींचा ऑडिओ

Goddess Lakshmi : लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास 10 उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील

Horoscope Today : आज काहींना गुंतवणुकीसाठी चांगला दिवस, तर कोणाचे पैसा वाया जाण्याची शक्यता; तुमची रास यात आहे का?

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

SCROLL FOR NEXT