Bhusawal Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime : प्रेमसंबंधात दोघांमध्ये वाद; प्रियकराने केली विवाहितेची हत्या

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : विवाहितेसोबत प्रेम संबंध असताना प्रियकर व महिलेचे वारंवार वाद व्हायचे. यातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून  भुसावळ तालुका पोलिस स्थानकात हत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील साकेगावमधील भिलाटी परिसरात वास्तव्यास असलेली सोनाली कोळी (वय २६) असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. सोनाली हि पती व मुलीसोबत राहत होती. दरम्यान तिचे गावातीलच संशयीत सागर रमेश कोळी (वय २८) याच्यासोबत प्रेम संबंध होते. मात्र मागील काही दिवसांपासुन सोनाली व सागर यांच्यात वारंवार भांडण व्हायचे. यातूनच सागर हा २५ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास सोनालीसोबत वाद घालत तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. (Crime News) यावेळी परिसरातील विनोद कुंभार हे त्यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेले होते. 

दोघांमध्ये वाद सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विनोद कुंभार यांना देखील मारहाण केली. याचवेळी सागरने सोनालीच्या हिच्या पाठीवर व पोटावर चाकूने सहा- सात वार केले. यात गंभीर झालेल्या सोनालीला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत विनोद कुभांर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सागर कोळी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपी सागर कोळी यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पोलिसांना पाहून घाबरला, थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; नेमकं काय घडलं? वाचा...

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT