Jalgaon Accident News
Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: रोहीतची सकाळ ठरली काळाची; सरावासाठी धावताना वाहनाची धडक, अपघातात दुर्दैवी मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

कजगाव (जळगाव) : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणासाठी सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून धावत असताना वाहनाच्या धडकेत (Accident News) कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला. (Tajya Batmya)

कजगाव (ता. भडगाव) येथील रोहित अशोक मराठे (वय १८) हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे (Bhadgaon) जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला.

मित्र मदतीला पण..

यावेळी मित्र वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन यांच्‍यासह दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील मदतीला धावले. उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन लावून उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची वार्ता कजगावात समजतात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेला रोहीत मराठे यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

पोलिस भरतीसाठी रोज सराव

रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याला पोलिस विभागाचे आकर्षण होते. त्यासाठी तो मित्रांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक करणे, सायंकाळी भरतीसाठी सराव करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या रोहितची सकाळ जणू काळ ठरली. ही घटना संपूर्ण गावातील नागरिक व रोहीतच्या मित्रांना धक्का देणारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKR vs DC: कोलकताच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; KKRसमोर १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

SCROLL FOR NEXT