Bhadgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhadgaon Accident News: पहाटेचा थरार..भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घुसले घरात; झोपेतच चिमुकलीचा मृत्‍यू, अन्य जखमी

पहाटेचा थरार..भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घुसले घरात; झोपेतच चिमुकलीचा मृत्‍यू, अन्य जखमी

Rajesh Sonwane

भडगाव (जळगाव) : भडगाव तालुक्यातील आमडदे येथे भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घरांमध्ये (Bhadgaon) घुसल्याने ११ वर्षीय बालिकचा जागीच मृत्‍यू झाला. तर मृत बालिकेच्या बहिणीसह शेजारील महिला (Accident) जखमी झाल्याची घटना आज पहाटेच्‍या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

भडगाव तालुक्‍यातील आमडदेनजीक वलवाडी रस्त्यावर भल्‍या पहाटे हा थरार झाला. गावातील गरीब वस्तीतील सर्व नागरीक झोपलेले होते. या दरम्‍यान सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चोरटी वाहतूक सुरू असलेल्‍या वाळूने भरलेले ट्रॅक्टर वस्‍तीतील तीन ते चार घरांमध्ये घुसले. अचानक झालेल्‍या या प्रकारामुळे परिसरात धावपळ व आरडाओरड सुरू झाली. काय झाले हे लवकर कोणाच्‍याही लक्षात आले नाही.

बालिकेचा मृत्‍यू तर दोन जखमी

वस्‍तीतील तीन ते चार घरांमध्ये ट्रॅक्‍टर घुसल्‍याने यात वैशाली बालू सोनवणे (वय ११) या चिमुकलीचा जागीच मृत्‍यू झाला. तर तिच्‍या जवळ असलेली तिची लहान बहीण पिंकी सोनवणे (वय ५) आणि घराशेजारी राहणारी बानूबाई वाघ (वय ४४) या जखमी झाल्या. जखमींना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेनंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला आअसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT