10th Standard Student Stabbed with Chopper Near School in Ayodhya Nagar saam tv
महाराष्ट्र

जळगाव हादरले! शाळा परिसरातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार; जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

Jalgaon School Student Chopper Attack Ayodhya Nagar: जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात एका दहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. जुन्या वादातून ही घटना घडली असून गंभीर जखमी विद्यार्थ्यावर शासकीय रुग्णालयात (GMC) उपचार सुरू आहेत.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. शाळा परिसरातच शाळकरी विद्यार्थ्यांमधील वादाचे हिंसक रूप पाहायला मिळाले असून, दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने चॉपरने प्राणघातक हल्ला केला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादाच्या रागातून एका दहावीतील विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना अयोध्या नगरातील एका शाळेजवळ घडली आहे. जखमी झालेला विद्यार्थी हा कुसुंबा येथील रहिवासी आहे.

शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दुसऱ्या विद्यार्थ्याने संधी साधत अयोध्या नगर परिसरातील एका शाळेजवळच पीडित विद्यार्थ्याला गाठले आणि त्याच्यावर धारदार चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. आपल्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोषीवर लवकरात लवकर आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात सायंकाळी काही गणेशमंडळाने भेट देतील

भाजपच्या माजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचे निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

Hair Loss: केसांना तेल लावताना 'या' चुका करू नका; नाहीतर वाढू शकतो हेअर फॉल

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT