Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News: अंगावरून गेले ट्रॅक्‍टर, तरूणाचा मृत्‍यू; वाळू वाहतुकदारांशी वादातून घात की अपघात?

अंगावरून गेले ट्रॅक्‍टर, तरूणाचा मृत्‍यू; वाळू वाहतुकदारांशी वादातून घात की अपघात?

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या तरूणाच्‍या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना मांडळ (ता. अमळनेर) येथे घडली असून, हा घात की अपघात (Accident) याबाबत पोलिस तपास करत आहेत. (Maharashatra News)

मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती असलेले जयवंत यशवंत कोळी (वय ३६) हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने कळवली. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला.

वाळू वाहतूकदारांशी झाला होता वाद

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची चर्चा आहे. मारवड पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT