Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

Suicide: मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आईसह मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Jalgaon News Suicide Case)

नीम (ता. अमळनेर) येथील समाधान जहाँगीर कोळी यांची पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ८) यांनी कळमसरे (Jalgaon) शिवारात वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला लागून असलेल्या भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. जयश्री कोळी या तीनच्या सुमारास कळमसरे बसस्थानकावर मुलीला घेऊन बसल्या होत्या. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेऊन पायी नीम गावाकडे रस्त्याकडे निघाल्या होत्या. दोघींच्या पायात चप्पलही नव्हती. कळमसरे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत उडी मारून या दोघींनी जीवनयात्रा संपविली.

सासू गेल्‍या होत्‍या देवदर्शनाला

दरम्यान, जयश्री कोळीला अजून एक चार वर्षाचा मुलगा आहे, तो जयश्री यांच्या माहेरी मामाकडे जैनाबाद (जळगाव) येथे शाळेत शिकतो. जयश्रीचा पती समाधान जहाँगीर कोळी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोलमजुरी करतो. जयश्रीची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर मंगळवारी देवदर्शनासाठी गेलेली होती. दरम्यान, जयश्री व मुलगी नंदिनीचा मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश साळुंखे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT