Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: गेल्‍या महिन्‍यातच झाला साखरपुडा; तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

गेल्‍या महिन्‍यातच झाला साखरपुडा; तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे (Railway) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेडहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मोहाडी (ता. जळगाव) येथील प्रवीण पितांबर मोरे-भिल (वय २०) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मोहाडी गावामध्ये आई- वडील, लहान भाऊ आणि बहिणीसह राहत होता. प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. प्रवीण भिल याचा मागील महिन्यात साखरपुडा झाला होता. मंगळवारी रात्री तो मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ गेला होता. तेथे खांबा नंबर ४२९/१२ डाऊन लाईन जवळ रेल्वे खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुचाकीवरून पटली ओळख

रेल्वे विभागाने बुधवारी मध्यरात्री दीड वाजता कळवल्यानंतर तालुका (Police) पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीमुळे त्याची ओळख पटली. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी आणि गावातील नातेवाईकांनी आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी अनिल फेगडे आणि अनिल मोरे करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT