सचिन बनसोडे
Shirdi News Today: मागिल काही दिवसात सोशल मिडीयावर साईबाबा संस्थान विरोधात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून त्यास धार्मिक रंग दिला जात होता. अशा समाजकंटकांवर संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सर्व धर्मियांच श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना विशिष्ट धर्माशी जोडण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानने एका विशिष्ट समुदायाला मोठी रक्कम दान दिल्याबद्दल एक व्हॉट्सअॅप पोस्ट प्रसारित करण्यात आली होती.
त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता साईबाबा संस्थानने चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरोधात कडक पाऊले उचलली असून साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्याविरोधात शिर्डी (Shirdi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी म्हंटल आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर काही लोक साईबाबा संस्थानला साईबाबांच्या झोळीत मिळालेल्या देणगीची काही रक्कम एका विशिष्ट समुदायाला देत आहेत असे चुकीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि काही लोकांनी अशी चुकीची माहिती प्रसारित केली होती.
त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच काही लोक साईबाबा आणि साईबाबा संस्थानची बदनामी करण्याचा कट रचत आहेत, मात्र अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी साईबाबा संस्थानने पोलिसांना केली आहे.
त्याचप्रमाणे तेलंगणा राज्यात काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर अशाप्रकारे चुकीचे संदेश प्रसारित झाल्याने तेथील साईभक्तांनी साई संस्थांनला लेखी तक्रार केली आहे. त्यानूसार साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धनजया नावाच्या व्हॉट्सअॅप नंबरसह साईबाबा संस्थानबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या इतर तीन व्हॉट्सअॅपनंबरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम 295 153 (ए) 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करतायत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.