Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : दोन दुचाकींची धडक, नंतर कारने उडविले; विचित्र अपघातात तीन ठार

Jalgaon News : अजून एक पिकअप व्हॅन मागून येत होती. या वाहनाच्या चालकाने अपघात पाहिल्यावर अचानक ‘ब्रेक’ दाबले

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : जामनेर ते बोदवडदरम्यान असलेल्या वाडीकिल्ला गावाजवळ झालेल्या विचित्र अपघात झाला. यात दोन (Jalgaon) दुचाकी एकमेकांना धडकल्यावर कारने या दोन्ही दुचाकींना उडविले. या (Accident) अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कारमध्ये बसलेल्या महिला जखमी झाल्या आहेत. (Latest Marathi News)

बोदवडहून जामनेरकडे जाणाऱ्या दत्तू रामा माळी व सुनील भोई यांच्या दुचाकीची आणि वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची धडक झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडली. यातच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दत्तू माळी, सुनील भोई आणि ईश्वर पारधी यांचा मृत्यू झाला असून, कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आणखी एका वाहनांची धडक टळली 

दोन दुचाकी आणि कारला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या आणि यावरच मागून आलेली कार आदळली. ही कार नंतर बाजूला जाऊन पडली. अजून एक पिकअप व्हॅन मागून येत होती. या वाहनाच्या चालकाने अपघात पाहिल्यावर अचानक ‘ब्रेक’ दाबले. मात्र, यामुळे ही व्हॅनही बाजूला जाऊन पडल्याने यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT