Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : महाविद्यालयाच्या कामासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक, एकजण जखमी

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

भुसावळच्या (Bhusawal) नाहाटा नगर येथील कुणाल राजेंद्र महाले (वय २५) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. कुणाल हा तीन महिन्यापूर्वीच भुसावळ शहरातील के. नारखेडे महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागला होता. महाविद्यालयाच्या कामकाजानिमित्त कुणाल महाले आणि त्याचे सहकारी निखिल शरद बऱ्हाटे हे दोन्ही विद्यापीठात येत होते. दरम्यान बांभोरी पुलाजवळ असलेल्या जकात नाक्यासमोरच मागून सुसाट वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला कट (Accident) मारला. या अपघातात कुणाल महाले महामार्गावर फेकले जाऊन मागून येणाऱ्या काँक्रिट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यात कुणालचा जागीच मृत्यू झाला.  

सोबत असलेला निखिल बऱ्हाटे हा किरकोळ जखमी झाला आहे. घटना घडल्यानंतर वाहनधारक व स्थानिक रहिवाशांनी मृतदेह आणि जखमीला शासकीय रुग्णालयात हलविले. तर पोलिसांनी अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर नातेवाईक व महाविद्यालयातील सहकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घरातील कमावता मुलगा गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल

Devendra Fadnavis Office: ती राडेबाज महिला मानसिक रुग्ण, सोसायटीतही घातला होता धुमाकूळ; अनेक VIDEO आले समोर

Nagpur News : गोंड गोवारी समाजाचं आंदोलन; पोलिस आणि आंदोलकांत धरपकड

Maharashtra News Live Updates : मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Shriya Pilgonkar: 'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्रीचे क्यूट फोटो

SCROLL FOR NEXT