Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: अपघातस्‍थळी थांबलेल्‍या मामाला बसला धक्‍का; भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक

अपघातस्‍थळी थांबलेल्‍या मामाला बसला धक्‍का; भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या (Accident) अपघातात २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. (Breaking Marathi News)

खेडगाव तांडा (ता. एरंडोल) येथील भाईदास संतोष राठोड व संदीप खिमा जाधव हे मोटरसायकलने ३ मे रोजी सायंकाळी एरंडोल (Erandol) येथून कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करून खेडगाव तांडा येथे जात होते. उमरदे गावाजवळील पुलाजवळ त्यांच्या मोटरसायकलला म्हसावदकडून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यात संतोष खिमा जाधव (वय २२) हा जागीच ठार झाला तर भाईदास संतोष राठोड हे गंभीर जखमी झाले.

दरम्‍यान मागून येणारे मयत संदीप जाधव यांचे मामा सुनील राठोड व दिनेश पवार यांना अपघात झाल्याचे दिसले. अपघातानंतर उमरदे येथील ग्रामस्थांनी ट्रक थांबवली. सुनील राठोड व दिनेश पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात आणले असता, संदीप राठोड हे मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी भाईदास राठोड यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशरचालक महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत (रा. दादरा नगर हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT