Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात; भरधाव डंपरने चिमुकल्याला चिरडले, संतप्त जमावाने पेटविला डंपर

Jalgaon News : घरापासून थोड्याच अंतरावर गेले असता कालिंका माता चौकात मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक यात योजस बऱ्हाटे डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला

Rajesh Sonwane

जळगाव : घरी मामा आल्याने बाहेरून चायनीज आणण्यासाठी निघाले होते. दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात नऊ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण व मामा हे जखमी झाले आहेत. दरम्यान अपघात घडल्यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडला आहे. 

जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात झालेल्या या अपघातात अयोध्यानगरातील योजस धीरज बऱ्हाटे (वय ९) या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. योजस बऱ्हाटे हा आई- वडिल व बहीण भक्ती बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत वास्तव्याला होता. दरम्यान बुधवारी भादली येथील त्याचा मामा योगेश बेंडाळे हा भेटण्यासाठी आला होता. भाच्यासोबत घरात थोडा वेळ घालविल्यानंतर मुलांनी हट्ट केला. यामुळे मामा- भाचे चायनीजचे पार्सल आणायला घराबाहेर पडले. 

घरापासून काही अंतरावरच घडली घटना 

घरापासून थोड्याच अंतरावर गेले असता कालिंका माता चौकात मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात योजस बऱ्हाटे डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर बहीण भक्ती व मामा योगेश बेंडाळे किरकोळ जखमी झाले. प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यादेखत डंपर चालकाने अनियंत्रित वेगाने येऊन दुचाकीला धडक दिली अन्‌ क्षणार्धात चिमुरड्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने सांगितले. 

संतप्त जमावाने पेटविला डंपर 

अपघातानंतर नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेताच काही कळायच्या आत जमावाने डंपरला घेराव घेतला. त्यानंतर संतप्त जमावाने डंपरला पेटवून देत महामार्ग रोखून धरला. घटनेनंतर चालक डंपर तसाच सोडून पळ काढल्याने तो बचावला. घटना कळल्यानंतर जुने जळगाव, जुने नशिराबाद रोड, आयोध्यानगर, कालिंका माता परिसरातून दोन ते तीन हजारांच्या जमावाने महामार्गावर दोन तास ठिय्या मांडून चालकाला आमच्या समोर आणण्याची मागणी केली. तर जमावाला पांगविण्यासाठी राखीव कमांडो फोर्सने लाठीचार्ज करताच चारही बाजूंनी जमावाने दगड व विटा भिरकावल्याने धावपळ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT