Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Bike Accident News: दुचाकीची लिफ्ट बेतली जिवावर; चाकात साडी अडकून वृद्ध महिला पडली रस्त्यावर

Old Woman Sari Caught In Wheel: दुचाकीची लिफ्ट बेतली जिवावर; चाकात साडी अडकून वृद्ध महिला पडली रस्त्यावर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एका वृद्धेचा विदगाव ते कानळदा रस्त्यावर गुरुवारी (२२ जून) सकाळी अपघातात (Accident) मृत्यू झाला. त्या वृद्धेने एखाद्या दुचाकीस्वाराकडून लिफ्ट मागितली असेल आणि दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून ती खाली (Jalgaon) पडून मृत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रभावती निंबा धनगर (वय ७३, रा. शिरसाड, ता. यावल) असे मृत वृद्धेचे नाव आहे. (Live Marathi News)

प्रभावती धनगर गुरुवारी जळगावकडे निघाल्या होत्या. बस, रिक्षा येत नसल्याने त्यांनी नाईलाजास्तव दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. कानळदा- जळगाव रोडने शहराकडे येत असताना वृद्धेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून प्रभावतीबाई क्षणार्धात रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. वृद्धा मृत झाल्याच्‍या भितीने दुचाकीस्वाराने आजीला सोडून पळ काढला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोचून मृत वृद्धेस जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. वृद्धेची ओळख पटविल्यानंतर तालुका पोलिसांनी शिरसाड (ता. यावल) येथे तिच्या कुटुंबीयांना कळविले. कुटूंबीयांनी तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली व मृतदेह पाहताच आक्रोश केला. याबाबत तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, संशयिताचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Kidney Trafficking : चंद्रपूर किडनी प्रकरणात दुसर्‍या आरोपीला अटक; चीन कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT