Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : शाळेतून आईसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; भरधाव डंपरची धडक

Accident News शाळेतून आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; भरधाव धमपरची धडक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शाळा सुटल्यावर आईसोबत घरी जाणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. (Jalgaon) भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर (Accident) चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे यांची मुलगी प्रेरणा (वय ४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता नेमाडे तिला स्कूटीने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनयजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. 

उपचारापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू 

जखमी प्रेरणा हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT