Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident: किर्तन आटोपुन परततांना किर्तनकाराचा मृत्यु; गॅस टँकरची दुचाकीला धडक

Jalgaon News : कैलास कोळी हे कुटुंबीयांसह खर्डी गावात वास्तव्यास होते. प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात कीर्तन करून घरी जात असताना गॅस ट्रॅकरने धडक दिल्याने कीर्तनकार महाराजांचा मृत्यू झाल्याची घटना (Jalgaon) जळगाव- पाचोरा मार्गावर रात्रीच्या (Accident) सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  (Live Marathi News)

खर्डी (ता. चोपडा) येथील कैलास प्रकाश कोळी (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. कैलास कोळी हे कुटुंबीयांसह खर्डी गावात वास्तव्यास होते. प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती. कीर्तन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान २३ डिसेंबरला त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ११ वाजेपर्यंत कीर्तन चालले. यानंतर ते दुचाकीने जळगाव येथे येत असताना जळगाव शहरा नजीकच्या रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कीर्तनकार कैलास कोळी यांचा जागेवरच मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघात (Accident News) घडल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. दुसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण आणि असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP ला आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीआधी बडा नेता सोडणार पक्षाची साथ

Nushrratt Bharuccha: लोकांचे रानटी विचार...; RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचा ट्रोल, 'त्या' आवाजाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक तगडा झटका; नीकटवर्तीय नेत्यानं दिला महापौरपदाचा राजीनामा

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT