Yawal Crime News: प्रेम विवाहावरून दोन गट भिडले; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Jalgaon News : मुलीच्या कुटुंबाकडील लोकही त्यांच्या घरी आले व आम्हाला या मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलिस ठाण्यात जायचे आहे, असे सांगत त्यांनी वाद घातला
Yawal Crime News
Yawal Crime NewsSaam tv
Published On

यावल (जळगाव) : प्रेमविवाह करण्यास आलेल्या मुलीकडील कुटुंबीयांचा मुलाकडील कुटुंबाशी वाद (Jalgaon) झाला. या वादानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी १४ जणांविरुद्ध गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Yawal Crime News
Rabi Hangam : पावसाअभावी रब्बी हंगामात घट; ऊस लागवड क्षेत्रात मात्र वाढ

सदरची घटना यावल शहरातील बाबूजीपुरा चौकात २३ डिसेंबरला घडली. बाबूजीपुरा चौकात चंदुलाल पंडित वानखेडे राहतात. त्यांच्या मुलासोबत प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी तरुणी त्यांच्या घरी आली. या मुलीच्या कुटुंबाकडील लोकही त्यांच्या घरी आले व आम्हाला या मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलिस ठाण्यात जायचे आहे, असे सांगत त्यांनी वाद घातला. यावरून दोन्ही गटांत हाणामारी झाली. यात ३८ वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yawal Crime News
Dhangar Reservation : आरक्षणासाठी येत्या काळात व्यापक स्वरूपात आंदोलन; धनगर समाजाचा बैठकीतून इशारा

परस्परविरोधी गुन्हे दाखल 

या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चंदुलाल वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भोई, रेखा भोई (दोघे रा. भुसावळ), लता नंदाने, दिलीप भोई, विनोद मोरे (तिघे रा. उल्हासनगर) व गिरीश भोई (रा. पाडळसे, ता. यावल) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या गटाकडून रेखा भोई (वय ३८) या जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदुलाल वानखेडे, विशाल भोई, मोहन भोई, लोकेश भोई, रोहित भोई, कोमल भोई, माधुरी भोई व सुमनबाई भोई (सर्व रा. यावल) या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील दोन फिर्यादीवरून तब्बल १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com