Jalgaon Accident News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

Jalgaon Accident News : अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत.

प्रविण वाकचौरे

Jalgaon News :

देवदर्शनावरुन परतताना कारला झालेल्या भीषण अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकोटहून दर्शन घेऊन परतणारी गाडी थेट दरीत कोसळली. जळगावच्या चाळीसगावच्या कन्नड घाटात हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काहीजण अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.  (Maharashtra News)

मृतांची नावे

प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५)

शिलाबाई प्रकाश शिर्के (वय वय ६०)

वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५)

पूर्वा गणेश देशमुख (वय ८)

जखमींची नावे

अनुज सुर्यवंशी (वय २०), जयेश सुर्यवंशी (वय २०), सिधेस पवार, (वय १२), कृष्णा शिर्के (वय ४), रूपाली देशमुख (वय ३०), पुष्पा पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हे जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील कॅम्प भागात कारच्या दरवाजाला धडकून विचित्र अपघात

Political News : 'गुंगी गुडीया'चा वाद राष्ट्रवादी रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा

Shakib Al Hasan: माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; दगडफेकीनंतर आग लावण्याचाही प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Noodles Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी नूडल्स, वाचा सोपी रेसिपी

Lanja Fort : इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण, 'लांजा'जवळ लपलाय 'हा' भव्य किल्ला, एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT